Tuesday, August 25, 2026
Homeजळगावशहरात ३ घरांमध्ये चोरीचा प्रयत्न ; चोरटे सीसीटीव्हीत कैद !

शहरात ३ घरांमध्ये चोरीचा प्रयत्न ; चोरटे सीसीटीव्हीत कैद !

शहरात ३ घरांमध्ये चोरीचा प्रयत्न ; चोरटे सीसीटीव्हीत कैद !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील रायसोनी नगरात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चोरट्यांच्या टोळीने तीन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. दोन ठिकाणी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले तर एका मेडीकल दुकानाचे कुलूप तोडतांना आवाज झाल्याने चोरटे तेथून पसार झाले. हा संपुर्ण प्रकार त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कोल्हे हिल्स परिसरात असलेल्या रायसोनी नगरात सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांच्या टोळीने तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये सुरुवातीला चोरट्यांनी एका बंद घराच्या सेफ्टी लॉक असलेल्या लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. मात्र चोरट्यांकडून त्या घराचा मुख्य दरवाजा न उघडल्यामुळे चोरटे तेथून पसार झाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा एका अपार्टमेंटमधील बंद घराकडे वळवला. यावेळी त्या अपार्टमेंटमधील मेडीकल स्टोअरच्या दुकानाचे कुलूप तोडत होते. मात्र आवाज झाल्याने चोरटे तेथून देखील पळाले. त्यानंतर चोरट्यांनी त्याच परिसरातील एका बंद असलेल्या घराच्या दिशेने निघाले. त्यांनी त्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. परंतु त्या घरात कोणीच राहत नसल्याने चोरट्यांनी त्याठिकाणाहून देखील रिकाम्या हाती परतावे लागले.चोरी करण्यासाठी आलेले चोरटे हे त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

दरम्यान, त्यामध्ये दोन चोरट्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून ते धष्टपुष्ट आहेत.तसेच त्यांनी चेहरा देखील काळ्या रंगाच्या मास्कने झाकलेला असून त्यांच्या हातात लोखंडी कटर सारखे हत्यार असल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेल्या फुटेमध्ये दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या