Friday, November 22, 2024
Homeजळगावजळगावात हॉटेलमध्ये ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या !

जळगावात हॉटेलमध्ये ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या !

जळगावात हॉटेलमध्ये ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बांधकाम साहित्य पुरविण्याचा व्यवसाय असलेल्या भोपाळ येथील भूषण भिका वाघ (३५) यांनी जळगावात थांबलेल्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,ही घटना २६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भूषण वाघ ८ ते १० दिवसांपासून कामानिमित्त जळगावात आले होते. एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. त्यांनी २६ सप्टेंबर रोजी, हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉटेल मालकांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली आहे. दरम्यान, पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत. मयताच्या पश्चात आई-वडील, लहान बहीण असा परिवार आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या