Friday, November 22, 2024
Homeजळगावशहरात एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेत केली आत्महत्या !

शहरात एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेत केली आत्महत्या !

शहरात एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेत केली आत्महत्या !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील मोहराळे येथे माहेरी राहत असलेल्या एका २० वर्षीय विवाहितेने बुधवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. विवाहितेने आत्महत्या का केली. याबाबत अद्याप कळू शकले नाही.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, चोपडा तालुक्यातील लोणी पंचक येथील रहिवासी सिमरन आकीब तडवी (२०) ही विवाहित तरुणी आपल्या माहेरी आई- वडिलांकडे गेल्या काही महिन्यांपासून राहत होती. दरम्यान बुधवारी सायंकाळी तिचे आई आणि वडील यावल शहरात आले असता घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात राजू तडवी यांनी दिलेल्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार राजेंद्र पवार करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या