Friday, May 1, 2026
Homeगुन्हातालुक्यात पुन्हा पकडला लाखोंचा गुटखा !

तालुक्यात पुन्हा पकडला लाखोंचा गुटखा !

तालुक्यात पुन्हा पकडला लाखोंचा गुटखा !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील मुख्य चौकातील अनिल किराणा दुकानातून यावल पोलिसांनी सुमारे १ लाख ४४ हजार ६८६ रुपयाचा गुटखा पकडला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, किनगाव बुद्रूक येथे गुटखा बंदी असता दुकानदार गुटखा विक्री करीत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले. या पथकाने तपासणी केली असता. दुकानात १ लाख ४४ हजार ६८६ रूपयांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी हवालदार नरेंद्र बागुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान मालक यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या