Friday, May 1, 2026
Homeजळगावलाडक्या बहिणींच्या राजकीय माया आणि अपेक्षामुळे भाजपचा झाला विजय.

लाडक्या बहिणींच्या राजकीय माया आणि अपेक्षामुळे भाजपचा झाला विजय.

लाडक्या बहिणींच्या राजकीय माया आणि अपेक्षामुळे भाजपचा झाला विजय!

काँग्रेसची २ दिवस आधीच समयसूचकता.

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – संपूर्ण राज्यासह रावेर विधानसभा मतदारसंघात ७० ते ८० टक्के लाडक्या बहिणींच्या राजकीय माया आणि आणि भविष्यात सुद्धा लाडकी बहिण योजना सुरू राहावी अशा भावी अपेक्षांमुळे आपल्या रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी पक्षाचे, महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचा दणदणीत विजयी झाला तसेच रावेर विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहिणींचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय तथा भक्कम असे उमेदवार धनंजय चौधरी यांनी समय सूचकता बाळगून मतदानाच्या २ दिवस आधीच आपला राजकीय हात आवरून घेतला होता अशी चर्चा रावेर विधानसभा क्षेत्रात आहे.
रावेर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षांसह व अपक्ष असे एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.प्रचारादरम्यान खरी लढत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी,प्रहार,व अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट चित्र होते परंतु प्रहार पक्षाचे अनिल चौधरी यांना सुद्धा मागच्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले,तसेच दारा मोहम्मद, वंचितच्या उमेदवार शमीभा पाटील यांना सुद्धा अपेक्षेप्रमाणे मतदान झालेले नाही.आणि हे अमोल जावळे यांना मिळालेली मते आणि महत्त्वाच्या दोन-तीन उमेदवारांना मिळालेली एकूण मते लक्षात घेतली असता तिन्ही उमेदवारांच्या आकडेवारीच्या पुढे भाजपला मतदान झाले याचाच अर्थ असा निघतो की रावेर विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहिणींच्या राजकीय मायेमुळे आणि पुढील अपेक्षांमुळे भाजपाला भरघोस असे मतदान झाले.रावेर विधानसभा मतदारसंघात शेवटच्या २ दिवसात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी जे सर्वतोपरी प्रयत्न केले.आणि लाडक्या बहिणींचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता त्या राजकीय सुनामीत मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या उमेदवाराची सामाजिक,राजकीय, आर्थिक बाजू पूर्णपणे भक्कम असताना सुद्धा समयसूचकता बाळगून आपला हात आवरता घेऊन टाकला होता.आणि कोणत्या उमेदवाराने मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त भटकंती करून विश्वासात घेतले आहे हे रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना ( आकडेवारी व फुली वरून ) चांगल्या प्रकारे ज्ञात आहे.
भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले असले तरी रावेर विधानसभा मतदारसंघात ज्या प्राथमिक मूलभूत समस्या आहे त्याबाबत आणि सर्वांगीण विकासासाठी आता काय काय प्रयत्न आणि नियोजन केले जाईल..? याकडे संपूर्ण राजकारणाचे लक्ष वेधून आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या