यावल नगरपरिषद संचलित,
पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे शालेय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न.

यावल दि.२७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी नगरपरिषद संचालित पी.एम.श्री
साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे सोमवार दि.२७ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते, प्रस्तुत कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य ए.एस.इंगळे सर, पर्यवेक्षक व्हि.ए.काटकर सर, व्ही.टी.नन्नवरे,सर ज्येष्ठ शिक्षक डी.एस. फेगडे सर,पी.एन.सोनवणे सर,एन.डी.नेवे सर तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी बंधू -भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.टी. नन्नवरे सर यांनी केले,
जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या तर्फे निमंत्रित आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण श्री अक्षय राजनकर, गोपाळ रंधाळे,भगवान पाटील,
संतोष बारी,नयना सपकाळे,संजय साळुंखे,जमीर तडवी,सलीम तडवी या सर्व टीम ने नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवल्यास अशा आपत्कालीन स्थितीत व्यक्तीला संकटातून बाहेर कसे काढावे? या संदर्भात चित्तथरारक प्रसंग सादर करून माहिती सांगितली.यामध्ये भूकंप,अपघात, विहिरीत पडणे,महापुरात सापडणे,
उंच इमारतीवर अटकलेली व्यक्ती इत्यादी सारख्या स्थितीत सापडल्यास सदर संकटातून बाहेर कसे काढावे? हे विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समजावून सांगितले,तसेच साधे
स्ट्रॅक्चर,चादरचे स्ट्रॅक्चर ,फोल्डेबल स्ट्रॅक्चर,चादर व बांबुचे स्ट्रॅक्चर , बांबू स्ट्रॅक्चर,दोरीचे स्ट्रॅक्चर ,यु स्ट्रॅक्चर,कॅरनोमेंटल रोपवे,रोपवेची शिडी,हॉक बॉडी हाॅन्रेस,टेस्टेड हेल्मेट,लाईफ गार्ड,अग्निशमन यंत्र मॅजिक रोपवे,असेॅडिंग रोपवे , डिसेॅडिंग रोपवे इत्यादी आपत्कालीन साधनांचा केव्हा?कुठे? व कसा? उपयोग करावा याची तपशीलवार माहिती शालेय आपत्कालीन व्यवस्थापन टीमचे प्रशिक्षक तथा पथनायक अक्षय राजनकर व त्यांची सहकारी “आपदा मित्र” यांनी शालेय विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांसमोर पीएमश्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भव्य पटांगणात सादर केली,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी.एस.फेगडे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.

