Tuesday, August 25, 2026
Homeगुन्हासंतापजनक : ७४ वर्षीय आजोबांनी केला ८ वर्षीय नातीचा विनयभंग !

संतापजनक : ७४ वर्षीय आजोबांनी केला ८ वर्षीय नातीचा विनयभंग !

संतापजनक : ७४ वर्षीय आजोबांनी केला ८ वर्षीय नातीचा विनयभंग !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील एका गावात ७४ वर्षीय आजोबांनी आपल्याच ८ वर्षीय नातीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तालुक्यातील एका गावातील ८ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. ७ रोजी दुपारी ३:३० ते ४ वाजेच्या सुमारास क्लासवरून घरी परतत होती. त्यावेळी आरोपी आजोबाने (वय ७४) या बालिकेला आपल्या खळ्यात नेत तिचा विनयभंग केला. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. आरोपीच्या विरोधात अल्पवयीन बालकांचे लैंगिक शोषण कायदा कलम ७४, ११, १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपीला दि. ८ रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या