Tuesday, August 25, 2026
Homeआत्महत्यायुवकाने मध्यरात्री संपविले आयुष्य ; गळफास घेऊन केली आत्महत्या !

युवकाने मध्यरात्री संपविले आयुष्य ; गळफास घेऊन केली आत्महत्या !

युवकाने मध्यरात्री संपविले आयुष्य ; गळफास घेऊन केली आत्महत्या !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – घरातील सदस्य गाढ झोपेत असतांना विजय उर्फ सनी मनोज छाबडिया (वय २३, रा. सिंधी कॉलनी) या तरुणाने गळफास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार दि. ८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील सिंधी कॉलनीत विजय छाबडिया हा वास्तव्यास होता. शुक्रवारी दि. ७मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तो घरीच होता. रात्रीच्या सुमारास घरातील सर्व सदस्य झोपलेले असतांना मध्यरात्री त्याने छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शेजारील मंडळींच्या मदतीने विजयला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या