Tuesday, August 25, 2026
Homeआत्महत्यारात्रीच्या सुमारास तरुणाने गळफास घेत संपविले आयुष्य !

रात्रीच्या सुमारास तरुणाने गळफास घेत संपविले आयुष्य !

रात्रीच्या सुमारास तरुणाने गळफास घेत संपविले आयुष्य !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – घरातील सदस्य गाढ झोपलेले असताना कपिल सुरेश सपकाळे (वय ३२, रा.नशिराबाद, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार दि. २३ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की तालुक्यातील नशिराबाद येथे कपिल सपकाळे हा तरुण वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना मध्यरात्री कपिल सपकाळे यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घअना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर कुटुंबियांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या