Sunday, July 20, 2025
Homeजळगावपहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम मंच भुसावळकडून तीव्र निषेध; राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम मंच भुसावळकडून तीव्र निषेध; राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम मंच भुसावळकडून तीव्र निषेध; राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी

 

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         जम्मू काश्मीरमधील पहलगाम खोऱ्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा बळी गेला असून, १९ हून अधिक जखमी झाले आहेत.
या अमानुष घटनेचा भुसावळ मुस्लिम मंच, यांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून, संबंधित दहशतवादी संघटनेवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

निषेध निवेदनाच्या माध्यमातून मुस्लिम मंचने देशाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्याकडे उपविभागीय अधिकारी भुसावळ मार्फत निवेदन सादर केले आहे .

निवेदनात म्हटले आहे की, अतिरेकी संघटना टी.आर.एफ. च्या अतिरेक्यांनी रिसॉर्टमध्ये विश्रांती घेत असलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करत २७ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला.

मुस्लिम मंचने मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.
तसेच जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे.

 

हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेचा जाहीर निषेध करत, अशा संघटनांवर कठोर कारवाई करून देशाच्या सुरक्षेसाठी निर्णायक पावले उचलावीत, अशी मागणी मुस्लिम मंचने केली आहे.

निवेदनावर सनी साबीर शेख, सलीम गवळी, शे नजर, फिरोज करेशी, अँड. एहतेशाम अलीक, शेख अकबर अहमद, रऊफ युसुफ शेख, जुनेद अशरफ खान यांची स्वाक्षरी आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या