Tuesday, March 10, 2026
Homeकृषीजळगाव जिल्ह्यातील सन २०२४ खरीप पीक विमा नुकसान भरपाई हवामान आधारित केळी...

जळगाव जिल्ह्यातील सन २०२४ खरीप पीक विमा नुकसान भरपाई हवामान आधारित केळी फळ पीक विमा योजनेतील समावेश बाबत ॲड. रोहित खडसे यांनी केली चर्चा.

जळगाव जिल्ह्यातील सन २०२४ खरीप पीक विमा नुकसान भरपाई हवामान आधारित केळी फळ पीक विमा योजनेतील समावेश बाबत ॲड. रोहित खडसे यांनी केली चर्चा.

यावल दि.२८  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील सन २०२४ खरीप पीक विमा नुकसान भरपाई आणि हवामानवर आधारित केळी फळ पीक विमा योजने समावेश करणेबाबत ॲड.रोहिणि खडसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी केली चर्चा.
शेतकरी हिताचा लढा यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे यांनी केली जिल्हाधिकारी यांचेशी सकारात्मक चर्चा.
जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनी, जिल्हा अधीक्षक कृषी,कृषी आयुक्त यांचेशी बोलून सन २०२४ खरीप हंगाम नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पीक विमा तक्रारदार शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात भरपाई रक्कम मिळण्याचे सकारात्मक आश्वासन दिले ..
शिवाय केळी पीक विमा हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत शासनाच्या नजर चुकीने बोदवड तालुक्याचा समावेश नव्हता परिणामी बोदवड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सातत्याने आ.एकनाथराव खडसे साहेब,अड रोहिणी खडसे सतत प्रयत्नशील होते आणि आहेत.
सुरवात पासून नाथाभाऊ यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांचेशी पत्रव्यवहार झाल्याने राज्य शासन स्तरावर जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या सुधारित अहवाल करून सदर बोदवड तालुका सन २०२५ / २६ साठी पात्र असल्याचे कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी सांगितले. तसेच,जिल्हा बँक मधून आधार कार्ड,पॅन कार्ड,७/१२नावात बदल असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यापासून वंचित ठेवू नये.. शेतकरी बांधवांना वेठीस न धरता विना विलंब तातडीने व्याज आकारणी न करता कर्जपुरवठा केला जावा,सकारात्मक निर्णय घेऊन व्याज आकारणी न करता पीक कर्ज देण्यात यावे ही मागणी ॲड. रोहिणी खडसे यांनी केली.प्रसंगी जिल्हा बँक चे MD जितेंद्र देशमुख साहेब उपस्थित होते.सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील,रामदासदादा पाटील,अजय पाटील,सतीश पाटील,पक्षाचे जिल्हा पदाधिकारी अशोक लाड वंजारी ,रिकु चौढरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या