Sunday, May 3, 2026
Homeजळगावआपुलकी  प्रोजेक्ट माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत.

आपुलकी  प्रोजेक्ट माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत.

आपुलकी  प्रोजेक्ट माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत.

१० मे पर्यंत पात्र पाल्यांची नोंदणी.

यावल  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            दि.३
जळगाव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्या लक्षवेधी संकल्पनेतून या
“आपुलकी” या प्रोजेक्टच्या माध्यमातून शैक्षणिक मदत केली जाणार असल्याची आणि त्यासाठी १० मे पर्यंत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांनी नावे नोंद करावी अशी माहिती तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी दिली.

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना मदत
करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जळगाव यांनी या प्रोजेक्टला  आपुलकी  हे नाव देण्यात दिले आहे.पुणे येथील  स्नेहवन   ही सामाजिक संस्था  शेतकरी आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या पाल्यांना मोफत निवासी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत आहे.देणार आहे, त्यानुसार आणि *मा.जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार आपल्या तालुक्यातील गरजू मुलांची निवड करून त्यांची नावे दि.१० मे २०२६ पर्यंत या कार्यालयास पाठवावी. त्यासाठी
पात्रता १) पाल्य शेतकरी आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे असावे. २.प्रवेश इयत्ता 1 ते 5 या वर्गात मिळेल. ३) आळंदी येथे निवासी शाळा शाळा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या