Tuesday, August 25, 2026
Homeगुन्हागणपती मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी दागिन्यासह रोकड लांबविली !

गणपती मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी दागिन्यासह रोकड लांबविली !

गणपती मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी दागिन्यासह रोकड लांबविली !

धरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील पाळधी येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या मंदिराची दानपेटी फोडून त्यातील ५० हजाराच्या रकमेसह २२ हजाराचे दागिने चोरीस गेल्याने गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, महामार्गावर असलेल्या व मणियार यांनी बांधलेल्या सिध्दी गणपती मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मागील दरवाजाचे कुलुपासह कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. या वेळी त्यांनी आधी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील जवळपास ५० हजाराची रक्कम व सिद्धी गणपतीच्या अंगावरील २२ हजारांचे ९ ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण ७२ हजाराचा ऐवज लंपास केला. या वेळी तेथे पुजारी झोपले असूनही त्यांना त्यांच्या सुगावा लागला नाही. ते सकाळी मंदिर उघडण्यास गेले असता हा प्रकार लक्षात आला. पाळधी पोलिसांना हा प्रकार समजताच पाळधी पोलीस चौकीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. या वेळी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन चोरटे मंदिरात जात असताना अस्पष्ट दिसत आहेत. मंदिरावर सुरक्षा रक्षक नसून घटनास्थळी चोपडा भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी घोलप, धरणगावचे पो.नि. पवन देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी भेट देऊन पाहणी केली. या बाबत व्यवस्थापक विनायक लक्ष्मण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास विठ्ठल पाटील करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या