धारदार कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – हातात धारदार पाते असलेला लोखंडी कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या उमेश भगवान जाधव (वय ३३, रा. अयोध्या नगर) व गणेश भगवान लोहार (वय २७, रा. अयोध्यानगर) या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील अजिंठा चौफुली परिसरात उमेश भगवान जाधव व गणेश भगवान लोहार हे दोघ हातात धारदार कोयता घेवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी प थकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दोघांवर कारवाई करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडून धारदार कोयता जप्त करण्यात आला असून पोलीस कर्मचारी शादाब अख्तर ईक्बाल सैय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे हे करीत आहे.