Tuesday, March 10, 2026
Homeकृषीतालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठकीत आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे,आ.अमोलदादा जावळे यांनी...

तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठकीत आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे,आ.अमोलदादा जावळे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कामकाजाची केली शासकीय मशागत.

तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठकीत आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे,आ.अमोलदादा जावळे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कामकाजाची केली शासकीय मशागत.

लोकप्रतिनिधींना समस्या सांगण्यासाठी वेळ नसल्याने शेतकरी वर्ग समस्याग्रस्त.

यावल दि.१२. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       यावल तालुका हा रावेर आणि चोपडा विधानसभा मतदारसंघात विभागला आहे रावेर मतदारसंघातून आमदार अमोल दादा जावळे तर चोपडा विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हे निवडून यायला ५ महिने झाले या ५ महिन्यात यावल तालुका कृषी अधिकारी वावरे यांनी आम्हा दोघं आमदारांना कृषी संदर्भात कुठलीच माहिती न दिल्याने तसेच संपर्कात न राहिल्याने शेतकऱ्यांच्या विविध योजना आणि समस्या या प्रलंबित राहिल्याने आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी तालुका कृषी अधिकारी वावरे यांना चांगलेच धारेवर धरले.
यावल तहसील कार्यालयात आज सोमवार दि.१२ मे २०२५ सकाळी १० वाजता तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे,तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर,पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यावल तालुका कृषी अधिकारी यांनी आयोजित केली होती या बैठकीत आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आमदार अमोलदादा जावळे यांची प्रमुख उपस्थिती राहिली.आमदार सोनवणे पुढे म्हणाले की,आम्ही दोघं आमदार निवडून यायला ५ महिने कालावधी उलटला परंतु तालुका कृषी अधिकारी वावरे यांनी समाजाचा,शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी कार्यालयीन आणि शासकीय स्तरावरून काय काय समस्या येत आहे याबाबत संपर्क साधला नाही.अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या विकासा संदर्भात चर्चा करणे आवश्यक आहे. आपण फुकट कामकाज करीत नाही शासनाकडून आपल्याला भरपूर पगार मिळतो आणि हा पगार जनता जी टॅक्स देते त्यातून आपला पगार होत असतो.तरी सुद्धा कृषी संदर्भात गेल्या पाच महिन्यात कुठलीच माहिती न दिल्याने कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. यावेळी यावल रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार सोनवणे आमदार जावळे यांनी मातीचे ‘पूजन’ करून केले.कृषी यांत्रिकीकरण योजना,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना,कापूस सोयाबीन व इतर तेलबिया मूल्य साखळी योजना,ठिबक सिंचन योजना तसेच पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिका योजनेचा क्षेत्र तपासणीचा प्रगती अहवाल, स्वर्गीय गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सानुगृह अनुदान योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प.
तसेच आपत्कालीन पीक नियोजनाबाबत निविष्ठांचे गुणवत्ता नियंत्रणाबाबत, गुण नियंत्रण भरारी पथक व तालुकास्तर नियंत्रण कक्ष, इत्यादी अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.आणि उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. यासोबत तालुक्यात विविध योजनांमधून देण्यात आलेल्या लाभाबाबत अहवाल तपासणी करण्यात आली.आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या तर उपस्थिती समस्यांवर योग्य ते मार्गदर्शन केले.

आमदार अमोलदादा जावळे –
तालुका कृषी अधिकाऱ्यांनाच जर शेतकऱ्यांच्या विविध योजनांची व शेती विषयक माहिती व जाणीव नसेल,शासकीय कामकाज करण्याची मानसिकता नसेल तर मग शेतकरी जातील कुठे असा प्रश्न आ.अमोल जावळेंचा यांनी उपस्थित करून शेतकऱ्यांच्या विकासा संदर्भात आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबाबत तीव्र चिंता आणि खंत व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या