Tuesday, February 17, 2026
Homeगुन्हाजळगाव आकाश भावसार खून प्रकरण : अल्पवयीन मुलांसह कोयता, चॉपरसह गावठी पिस्तुल...

जळगाव आकाश भावसार खून प्रकरण : अल्पवयीन मुलांसह कोयता, चॉपरसह गावठी पिस्तुल हस्तगत !

जळगाव आकाश भावसार खून प्रकरण : अल्पवयीन मुलांसह कोयता, चॉपरसह गावठी पिस्तुल हस्तगत !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – प्रेमसंबंधाच्या वादातून मारहाण केल्याच्या रागातून आकाश पंडीत भावसार (वय २७, रा. अशोक नगर) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अटक असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघ संशयितांकडून कोयता, चॉपरसह गावठी पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी संशयितांपैकी एकाने आकाशवर गोळी झाडली, मात्र ती अडकून पडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून पोलिसांनी गावठी पिस्तुल देखील हस्तगत केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, वारंवार पत्नीच्या संपर्कात असलेल्या अजय मोरे याला मयत आकाश भावसाने याने दोन ते तीन वेळा मारहाण केल्याचा राग अजयच्या मनात होता. खूनाच्या दिवशी रात्रीच्या सुमारास संशयित अजय मोरे, चेतन सोनार व कुणाल उर्फ सोनू चौधरी यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांनी दारु रिचवली. त्यानंतर तेथूनच ते अशोक नगरात असलेल्या आकाशच्या घरी गेले. त्यांना आकाश हा कालिंका माता मंदिराजवळील भरीत सेंटरजवळ असल्याचे समजाच ते त्याठिकाणी गेले. दुचाकीवर आलेल्यांपैकी कुणाल उर्फ सोनू चौधरी याने त्याजवळील गावठी कट्टूयातून आकाशवर गोळी झाडली. मात्र ती बंदूकीतच अडकून पडल्यामुळे त्याचा प्रयत्न फसला. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्यांनी धारदार कोयत्यासह चॉपरने आकाशवर सपासप वार करीत त्याची निघुण हत्या केली.खूनाच्या दिवशी संशयित हल्लेखोरांनी आकाशवर फायरींग केल्याची देखील चर्चा होती. त्यानुसार शनिपेठ पोलीसांकडून त्या दृष्टीने देखील तपास केला जात होता.

दरम्यान, संशयितांना दि. १३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी असल्यामुळे पोलिस कोठडीत त्यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यारांसह गावठी पिस्तुल देखील जप्त केली आहे. खून प्रकरणात अटकेत असलेल्या संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांना न्यायालयाने दि. १३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याने मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या