Thursday, August 27, 2026
Homeगुन्हाग्राहक वळविल्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण ; दोघं जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

ग्राहक वळविल्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण ; दोघं जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

ग्राहक वळविल्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण ; दोघं जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आमच्या दुकानावर येणारे ग्राहक तुम्ही वळविल्याचे म्हणत नवीद अकिल खाटीक यांच्या डोक्यात एक किलोचे माप शेजारील दुकानदाराने मारले. ही घटना १० मे रोजी कासमवाडी परिसरात घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, नवीद खाटीक यांचे कासमवाडी परिसरात दुकान आहे. त्यांच्या शेजारील दुकानदार त्यांच्याकडे आला व तुम्ही आमचे ग्राहक तुमच्याकडे वळविले आहे. तुम्हाला जास्त झाली आहे, असे म्हणत एक किलो वजनाचे माप डोक्यात मारले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच तेथे आणखी एक जण आला व त्याने नवीद व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली.
या घटनेबाबत खाटीक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. संजीव मोरे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या