तापी नदीत अंघोळीसाठी उतरले अन मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात बुधवारी सकाळी तापी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या जालना येथील मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रामराजे नंदलाल नाटेकर (वय ५५) आणि आर्यन नितीन काळे (वय २१) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, दोघेही मूळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून पेंढारवाडा भुसावळ येथे संदीप हरिश्चंद्र रणधीर यांच्याकडे कार्यक्रमासाठी आले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास रामराजे नाटेकर हे आर्यन याच्यासोबत तापी नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते. अंघोळ करताना अचानक पाय घसरल्याने दोघेही नदीत बुडाले. परिसरातील नागरिकांनी दोघांनाही ट्रामा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमन चौधरी यांनी त्यांना मृत घोषित केले.