फैजपुर पोलीस उपविभागात उत्कृष्ट कामगिरी बद्दल ४ पोलीस अंमलदारांना कृष्णात पिंगळे यांनी बक्षीस देऊन गौरव केला.

यावल दि.२३ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी फैजपूर उपविभाग फैजपूर पोलीस कार्यक्षेत्रातील एकूण चार पोलीस अंमलदार यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ उपविभाग भुसावळ तथा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर कृष्णात पिंगळे यांनी दरमहा बक्षीस देऊन पोलीस अंमलदार यांचा गौरव केला.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, माहे एप्रिल २०२५ मध्ये दिनांक २२/ ४/ २०२५ रोजी आयोजित गुन्हे बैठकीदरम्यान खालील पोलीस अंमलदार यांना ” पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ ” म्हणून पुढील प्रमाणे गौरविण्यात आले आहे
रावेर पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद सुभाष पाटील
(ब.नं.२१६८) यांनी माहे मे २०२५ मध्ये पोलीस अंमलदार यांनी पोलीस स्टेशन कडील दाखल CCTNS २०१३/२०२५ महा. प्राणी सुधारणा अधिनियम १९९५ चे सुधारित अधिनियम २०१५ चे कलम ५,५( अ ) ( ब ), ( क ), ( ड ) भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५ ,३ ( ५ ) प्रमाणे दाखल गुन्ह्यात गोपनीय माहिती काढून उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल.
यावल पो.स्टे.मधील किशोरसिंग नारायणसिंग परदेशी ब.नं. ९५६ यांनी त्याचे कडेस तपासावर असलेले भाग ५ -१२, भाग
६ – ११ प्रोव्हीबिशन ०९. व अकस्मात मृत्युचे ०७ असे एकुण ३९ प्रकरणांचा मुदतीत निपटारा करून पो.स्टे. हद्दीतील MPDA मधील आरोपी नामे दिवाकर
टोपलु तायडे रा.अट्रावल ता.यावल याचा पुणे येथे जावुन मोठ्या कौशल्याने शोध घेवून त्यास ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह कोल्हापुर येथए जमा केले आहे. तसेच त्यांचे कडेस तपासावर असलेल्या मिसींग मधील ०३ पुरूष व ०५ महिलांचा शोध घेवुन
उल्लेखनिय कामगीरी केली आहे.
निंभोरा पोलीस स्टेशन मधील पो. कॉ.रशीद तुराब तडवी ब.नं.( १४७१ ) या पोलीस अंमलदार यांनी त्यांचे बिट हद्दीतील सर्व समन्स / वारंटाची १०० टक्के बजावणी करून बिट हद्दीतील नागरीकांशी जातीय सलोख्याचे संबंध प्रस्तापीत करून उल्लेखनिय कामगीरी केली.
फैजपूर पोलीस स्टेशन मधील सहाय्यक फौजदार विजय यमराज चौधरी ब.नं.२०२२ यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून नुकतेच पार पडलेले सण उत्सव शांततेत पार पाडून गोपनीय रेकॉर्ड अद्यावत करून उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे.म्हणून या चारही पोलीस कर्मचाऱ्यांना फैजपूर उपविभागीय प्रभारी पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल दरमहा बक्षीस देऊन त्यांचा गौरव गौरव केला.
फैजपुर उपविभाग अंतर्गत पोलीस ठाण्यातील अधिकारी / अंमलदार यांनी नागरिकांना सौजन्याची वागणुक देणे,पोलीस दलाची
जनमानसातील प्रतिमा उंचावणे साठी वेळीच गुन्हयातील पीडीत यांची दखल घेणे,पोलीस ठाणेस दाखल होणारे गुन्हयांचा तत्काळ कौशल्यपूर्वक तपास करणे,
प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे. दोषसिध्दीचे प्रमाण वाढविणे, जास्तीत जास्त गुन्हे प्रकटीकरण होणेसाठी सातत्याने उत्कृष्ट कर्तव्य
बजावुन “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” याप्रमाणे सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा सर्वनाश करणेसाठी सांधिक भावना वाढीस लागण्यासाठी सदरची संकल्पना राबविण्यात येत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ उपविभाग भुसावळ तथा प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी हा स्तुत्य शासकीय स्तरावरील उपक्रम राबविल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

