Sunday, April 5, 2026
Homeजळगावजिल्ह्यातील ७ कृषी परवाने निलंबित !

जिल्ह्यातील ७ कृषी परवाने निलंबित !

जिल्ह्यातील ७ कृषी परवाने निलंबित !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मान्सूनपूर्वीच विविध कारणांनी कृषी विभागाने जिल्ह्यातील ७ कृषी परवान्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. भरारी पथकाच्या तपासणीत या कृषी केंद्रांमध्ये अनियमितता तसेच नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने मार्च महिन्यापासून कृषी केंद्रांची तपासणी सुरू झाली आहे. या तपासणीत अनियमिततेसह अन्य बेकायदेशीर बाची निदर्शनास आल्याने नोटीस बजावून या विक्रेत्यांना म्हणणे माढण्याची संधी दिली होती. त्यानुसार अंतिम सुनावणीत ७ कृषी परवाने निलंबित केले आहेत परवाने निलंबित झालेल्या कृषी केंद्रांमध्ये पारोळा, यावल, चाळीसगाव, धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन परवानाधारकांचा समावेश आहे. तर जामनेरमध्ये एका परवानाधारकावा निलंबनाची कारवाई करणयात आली आहे. चोपडा तालुक्यातील तावसे, पारोळ्यातील मुंदाणे व मिलाली, पाळीसगावमधील तांबोळे व कुझर, पाळची ता.धरणगाव व धरणगाव, यावलमधील दहीवद पाडळसे व जामनेर शहरातील एका विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या