Sunday, April 5, 2026
Homeजळगावमुख्य जलवाहिनीवरून वॉशिंग सेंटरला २४ तास मोफत पाणीपुरवठा : नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारावर...

मुख्य जलवाहिनीवरून वॉशिंग सेंटरला २४ तास मोफत पाणीपुरवठा : नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारावर नागरिकांचा संताप !

मुख्य जलवाहिनीवरून वॉशिंग सेंटरला २४ तास मोफत पाणीपुरवठा : नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारावर नागरिकांचा संताप !

चार महिन्यांपासून कारवाई ठप्प !

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील नगरपंचायत हद्दीतील दोन ते तीन वॉशिंग सेंटरना शहराच्या मुख्य जलवाहिनीवरून थेट आणि मोफत २४ तास पाणीपुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुज्ञ नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही योग्य ती कारवाई न झाल्याने नगरपंचायतीच्या भोंगळ व भ्रष्ट कारभाराबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.एप्रिल 2025 मध्ये नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी पाणीपुरवठा निरीक्षकांना हे अवैध नळ कनेक्शन तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अवैध नळजोडण्या : ना परवाना, ना महसूल
बुरहानपूर रोडवरील कब्रस्तानलगत दोन वॉशिंग सेंटरना मुख्य पाइपलाईनवरून बेकायदेशीररीत्या नळजोडणी देण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

ना परवानगी,ना नोंद, ना महसूल

दररोज हजारोंची उलाढाल करणाऱ्या या वॉशिंग सेंटरच्या मालकांकडून नगरपंचायतीला एक रुपयादेखील महसूल मिळत नाही, हेही उघड झाले आहे. यामुळे “अधिकाऱ्यांचे कोणाचे तरी पाठबळ आहे का?” असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
मागील काळात नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांनी कर वसुलीत लाखो रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले होते. सध्याचा प्रकारही त्याच साखळीचा भाग तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या