Tuesday, August 25, 2026
Homeगुन्हापेट्रोल पंपाचा मालक समजून चौघांनी केली जबर मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

पेट्रोल पंपाचा मालक समजून चौघांनी केली जबर मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

पेट्रोल पंपाचा मालक समजून चौघांनी केली जबर मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील मेहरुणजवळील एका पेट्रोल पंपावर ‘स्पीड पेट्रोल’ नसल्याच्या कारणावरून एका ग्राहकाला पेट्रोल पंपाचा मालक समजून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी घडला. या घटनेत एका आरोपीने लोखंडी कड्याने मारून ग्राहकाला जखमी केले असून, याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, संजय नामदेव ढेकळे (वय ५४, रा. आदर्शनगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ढेकळे यांनी दिलेल्या फिर्यादीच्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ढेकळे आपल्या चारचाकी वाहनात, डिझेल भरण्यासाठी मेहरुणजवळील एका पेट्रोल पंपावर गेले होते. त्याचवेळी दोन मोटारसायकलवर शुभम सुनील शिंदे, शरद अशोक पाटील, कुणाल पाटील आणि शेखर (पूर्ण नाव माहिती नाही) हे चौघेजण आले. या चौघांनी ढेकळे यांना पेट्रोल पंपाचा मालक समजून ‘तुमच्याजवळ स्पीड पेट्रोल का नाही?’ असे विचारत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढल्यानंतर चौघांनी ढेकळे यांना शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी शरद पाटील याने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने ढेकळे यांच्या कपाळावर मारून त्यांना दुखापत केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या