शासनाच्या सगळ्या योजना सुलभ सहज आणि पारदर्शक पद्धतीने ग्रामस्थांच्या घरापर्यंत आणि दारापर्यंत आमदार अमोल दादा जावळे.

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराला कठोरा येथे उत्तम प्रतिसाद.
यावल दि.२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाचा उद्देश एकच आहे शासनाच्या सगळ्या सेवा सुविधा योजना ज्या आहेत त्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शक पद्धतीने आपल्या घरापर्यंत,दारापर्यंत पोहोचविण्याचे काम आपण प्रशासनाच्या माध्यमातून करत असल्याचे रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावळे यांनी सांगितले.
यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अभियान निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महायुतीचे सरकार राज्यात आले आहे ज्या विचाराने हे सरकार आले आहे ते म्हणजे अत्योदय म्हणजे काय तर शासनाच्या सगळ्या ज्या सेवा सुविधा योजना ज्या आहेत त्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करतो आहे या विचाराने सरकार प्रयत्न करीत आहे.
शासनाचा उद्देश एकच आहे शासनाच्या सगळ्या सेवा सुविधा योजना ज्या आहेत त्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायच्या आणि पोहोचवत असताना कशा पोहोचल्या गेल्या पाहिजे सहज सुलभ आणि अत्यंत पारदर्शकपणे पोहोचल्या पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करतो आहे आपण अनुभवलं आहे की या आधी आपल्याला प्रत्येकाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत होतं आता तालुक्याच्या ठिकाणच्या फेऱ्या कमी करण्यासाठी शासनाच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या सुलभ सहज आणि पारदर्शक पद्धतीने आपल्या घरापर्यंत आपल्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण प्रशासनाच्या माध्यमातून करत आहोत यासाठी आपल्या शासनाकडून तसे आदेश सुद्धा आहेत आणि आपले यावल प्रांताधिकारी बबनराव काकडे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे शासकीय कामकाज कर्तव्य चांगले असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
आज दि.२ जून २०२५ रोजी डोंगर कठोरा तालुका यावल येथे श्री खंडेराव महाराज मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात आले सर्व प्रथम वृक्ष रोपण करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अमोलदादा जावळे हे होते सर्व प्रथम प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी तहसिलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी शेतकऱ्यांसाठी शेती रस्ते, फार्मर आयडी,पि.एम.किसान योजना व विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व यावल रावेर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी शेतकऱ्यांसाठी व विद्यार्थी विद्यार्थी यांना तत्काळ शैक्षणिक दाखले संदर्भत माहिती दिली आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी आदिवासी मुला मुलींना आश्रम शाळेत कॅम्प घेऊन जातींचे व उत्पन्न दाखले फ्री मध्ये वाटप केले व आदिवासी शाळेत वसतिगृह बांधण्यात आले आहे हे आमदार अमोलदादा यांच्या प्रयत्ननी साकार झाले आहे असे बोलताना ते म्हणाले या वेळी आदिवासी जातींचे दाखले संजय गांधी निराधार योजना मंजूर झालेले लाभार्थी यांना एक वृक्ष व मंजूर पत्र वाटप केले गावातील रेशन कार्ड मध्ये ऑनलाईन नाव सामाविस्ट करण्यासाठी ऐकून १४७ अर्ज प्राप्त झाले आहे आमदार अमोलदादा जावळे यांनी ग्रामीण भागातील गोर गरीब लाभार्थी यांना घरकुल योजना चालू आहे त्यात कोणीही विलंब किंवा पैशाची मागणी करू नये असे आढळ्यास त्वरित संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करणार असे पंचायत समिती अधिकारी यांना धारेवर धरले असता अधिकारी यांचे तारांबळ उडाली तसेच यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याने त्या बद्दल गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय रंगला आहे कार्यक्रमाला बाल विकास अधिकारी श्रीमती अर्चना आटोळे, पंचायत समिती गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, नायब तहसिलदार विनंते,संजय गांधी नायब तहसिलदार मनोज खारे,माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, माजी जिल्हा बँक संचालक प्रशांत चौधरी,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, मदतनीस,ग्रामस्थ,सरपंच नवाज तडवी,उप सरपंच,योगेश पाटील, सदस्य दिलीप तायडे,कल्पना राणे तलाठी गजानन पाटील, कोतवाल विजय आढाळे,ग्रामसेवक बगडे, व पोस्ट ऑफिस कर्मचारी अनिल सोनावणे कृषी अधिकारी,आरोग्य कर्मचारी डॉक्टर,नर्स,सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी तलाठी गजानन पाटील व कोतवाल विजय आढाळे यांनी परिश्रम घेतले.

