डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकऱ्याने गळफास घेत केली आत्महत्या !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील वडली येथील ४३ वर्षीय शेतकरी गणेश अशोक पाटील यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने तणाव आल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२ जून) दुपारी वडली येथे घडली. गणेश पाटील हे शेती काम करायचे. शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतलेले होते, ते कसे फेडावे या विवंचने ते होते.
सोमवारी दुपारी त्यांची पत्नी बाहेर असताना घरात एकटेच असलेल्या गणेश यांनी गळफास घेतला. पत्नी घरात आली त्यावेळी पतीने गळफास घेतलेला होता. गणेश यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

