Friday, May 1, 2026
Homeजळगावराज्यस्तरावरील लोकप्रतिनिधी हिंदू मुस्लिम समाजात गैरसमज पसरवीत आहेत - हाजी शब्बीरखान शेठ

राज्यस्तरावरील लोकप्रतिनिधी हिंदू मुस्लिम समाजात गैरसमज पसरवीत आहेत – हाजी शब्बीरखान शेठ

राज्यस्तरावरील लोकप्रतिनिधी हिंदू मुस्लिम समाजात गैरसमज पसरवीत आहेत – हाजी शब्बीरखान शेठ

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – राज्यस्तरावरील काही ठराविक लोकप्रतिनिधी हे आपल्या सोयीनुसार वैयक्तिक आणि आपल्या राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रसिद्धी माध्यमांद्वारे हिंदू – मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण करीत असल्याचे प्रतिपादन यावल येथील शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य तथा भारतीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ आणि श्रेष्ठ पदाधिकारी हाजी शब्बीरखान सेठ यांनी व्यक्त केले.

यावल पोलीस स्टेशन आवारात आज ५ जून २०२५ संध्याकाळी ५ वाजता बकरी ईद सणानिमित्त शांतता समिती सदस्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत यावल पोलीस स्टेशनला दोन दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या व पशुवैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.ते पुढे म्हणाले की यावलकर नागरिक हे कायदा पालन करणारे आहेत,तरुण मुलांच्या हालचालीवर शांतता समिती सदस्यांनी तसेच समाजातील जेष्ठ अनुभवी नागरिकांनी लक्ष ठेवायला पाहिजे, कोणीही कायदा हातात घ्यायला नको असे त्यांनी सांगितले.पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी आपल्या यशस्वी कामकाजाची माहिती देऊन सर्व शांतता समिती सदस्यांचे स्वागत करून यावल शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना उपस्थित शांतता समिती सदस्यांना दिल्या.शांतता समिती बैठकीत यावल शहरातील हिंदू-मुस्लीम बांधव शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या