Sunday, June 8, 2025
Homeजळगावयावल पूर्व- पश्चिम वन विभागात सागवान,फळझाडे,बाभूळ,जळाऊ लाकडांसह मौल्यवान लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी.

यावल पूर्व- पश्चिम वन विभागात सागवान,फळझाडे,बाभूळ,जळाऊ लाकडांसह मौल्यवान लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी.

यावल पूर्व- पश्चिम वन विभागात
सागवान,फळझाडे,बाभूळ,जळाऊ लाकडांसह मौल्यवान लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी.

पूर्व पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

यावल दि.८   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यातील
यावल पूर्व आणि पश्चिम वन विभागात सागवान,
फळझाडे,बाभूळ,जळाऊ लाकडांसह मौल्यवान
लाकडाची मोठ्या प्रमाणात तोड केली जात आहे, अवैध वाहतूक,तस्करी दैनंदिन रित्या सर्रासपणे सुरू आहे याकडे मात्र यावल वन विभाग जळगाव ( प्रादेशिक कॅम्प ) उपवनसंरक्षक,सहाय्यक वनसंरक्षक यांच्या आशीर्वादामुळे आणि यावल पूर्व पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मिली- भगतमुळे नाम मात्र कारवाई कागदोपत्री होत असल्याची चर्चा यावल तालुक्यात आहे.
यावल पूर्व आणि पश्चिम वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रात अनेक मौल्यवान वृक्षाची सर्रासपणे वृक्षतोड होऊन त्या लाकडांची वाहतूक ट्रॅक्टर,ट्रक, मोटरसायकल,सायकलीवरून बिनधास्तपणे होत असताना नागरिकांना दिसून येत आहे परंतु वनविभागातील कर्मचाऱ्यांना नाकी कारकून यांना दिसून येत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.काही मजूर मोटर सायकल आणि सायकल वरून वाहतूक करणारे म्हणतात की आमच्या पोटापाण्याचा विषय आहे आमच्याकडून काही लोक हप्ते घेतात.लाकूडतोड करण्यासाठी आणि वाहतुकीसाठी आम्हाला पैसे द्यावे लागतात त्यातून दोन पैसे आम्हाला मिळत असून आमचा घर खर्च निघतो.याचप्रमाणे ट्रॅक्टर, ट्रक मध्ये वरील प्रकारचे लाकूड भरून ताडपत्रीने झाकून काही ठराविक तोल काटा / वजन काट्यावर वजन माप करून या अवैध लाकडाची बिना पास अवैध वाहतूक सर्रासपणे केली जात आहे वन विभागाचे ठिकठिकाणी तपासणी नाके असताना सुद्धा वाहतूक होते कशी याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.यावल तालुक्यात आणि शहरात काही स्वामीलवर जुन्या सागवानी लाकडाच्या नावाने पासेस काढून या पासेसवर मात्र नवीन सागवानी लाकडाची तस्करी सर्रासपणे सुरू आहे, ठिकठिकाणी फर्निचर,लाकूड व्यवसायिकाचे दुकाने छुप्या ठिकाणी सुरू असताना यांच्याकडून कोण कोण हप्ते वसूल करीत आहे..? या काही फर्निचर विक्रेत्यांविरुद्ध आतापर्यंत किती कारवाया झाल्या..? याबाबत सर्वत्र चर्चा असून यावल पूर्व आणि पश्चिम वनपरिक्षेत्रात काही वेळेस फक्त नाम मात्र कारवाई केली जात असून इतर वेळेला अवैध धंदे बंद आहेत का..? याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, फिरते पथक अधिकाऱ्यांनी अचानक गोपनीय पद्धतीने धाडी टाकल्यास यावल पूर्व आणि पश्चिम वनपरिक्षेत्रात अवैध लाकूडतोड आणि बिना पास अवैध वाहतूक उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा लाकूड व्यवसायिकांमध्ये बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या