कोरपावली येथील शेळी चारणाऱ्या तरूणाचा सांडपाण्याच्या खड्डयात चिखलात पडून दुदैवी मृत्यु.

यावल दि.९ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील कोरपावली येथील शेळ्या चालणाऱ्या तरुणाचा गावाला लागत असलेल्या नाल्यातील चिखलात शेळी वाचवण्यासाठी बुडून मृत्यू झाला याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दिनांक आठ रोजी गावालगत असलेल्या नाल्या च्या काठावर सायंकाळी सात वाजेचे सुमारास जयेश संतोष महाजन वय 18 हा शेळ्या चारण्यासाठी गेला होता शेळ्याचारीत असताना त्यातील एका बकरीचा पाय घसरून ती नाल्यातील डबक्यात पडली तिला वाचवण्यासाठी त्याने प्रयत्न केले असता तो स्वतः सांड पाण्याच्या चिखलात बुडून मयत झाला जयेशला काढण्यासाठी गावकऱ्यांनी तातडीने प्रयत्न केले मात्र त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले जयेश जयशहा गरीब कुटुंबातील तरुण होता शेळ्या चारून तो आपला उदरनिर्वाह करीत होता त्याचे पक्षात दोन भाऊ वडील असा परिवार आहे याबाबतची खबर जयश्री काका विनोद काशिनाथ महाजन यांनी दिले वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हवालदार वसीम तडवी हे करीत आहेत

