Friday, June 13, 2025
Homeजळगावमायेची सावली’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य प्रकाशन सोहळा

मायेची सावली’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य प्रकाशन सोहळा

‘मायेची सावली’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य प्रकाशन सोहळा

मुंबई | प्रतिनिधी.  खानदेश लाईव्ह न्युज
मुक्ताईनगरच्या सुपुत्र आणि पत्रकार छबिलदास पाटील लिखित ‘मायेची सावली’ या हृदयस्पर्शी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.

या विशेष प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, माफदा प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ, छोटू भोई, नवनीत पाटील, किशोर चौधरी, तसेच संत मुक्ताई पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शरद बोदडे, सचिव संदीप जोगी, राजेश चौधरी, निलेश मेढे, अमोल वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखक छबिलदास पाटील यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत म्हटले, “समाजामध्ये मूल्यांची जपणूक करणारे आणि पिढीला दिशा देणारे असे साहित्य हे आजच्या काळात फारच आवश्यक आहे.”

आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “या पुस्तकातून तरुण पिढीला आई-वडिलांविषयी आदर आणि जबाबदारी याचे भान मिळेल. अशा प्रकारची लेखनशैली समाजात सकारात्मक परिवर्तन घडवेल.” असा विश्वासही आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केला.

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनीही लेखकाच्या कार्याची स्तुती करत त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

‘मायेची सावली’ हे पुस्तक म्हणजे केवळ एक साहित्यकृती नाही, तर आई-वडिलांविषयी कृतज्ञता, आदर आणि जबाबदारी या मूल्यांना उजाळा देणारा एक हृदयस्पर्शी प्रवास आहे.

लेखक छबिलदास पाटील यांनी अत्यंत संवेदनशीलतेने लिहिलेल्या या पुस्तकात, आजच्या धावपळीच्या जगात मुलांनी आपल्या आई-वडिलां देवस्वरूप मानावे, त्यांची सेवा करावी, त्यांचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, यावर भर दिला आहे.

प्रत्येक तरुणाने हे पुस्तक वाचून आत्मपरीक्षण करावे आणि पालकांविषयी आदर व्यक्त करणारा सामाजिक दृष्टिकोन अंगीकारावा, हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या