प्रभाग क्र. १९ मधील ३७५ बांधकाम कामगारांना मोफत गृहउपयोगी भांडी संच वाटप
माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या पुढाकाराने योजना यशस्वी
भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने श्रीराम नगर मधील प्रभाग क्रमांक १९ मधील बांधकाम करणाऱ्या महिला कामगारांसाठी मोफत गृहउपयोगी भांडी संच (३० वस्तूंचा सेट) गुरुवारी सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माजी नगरसेवक निर्मल (पिंटू)कोठारी यांनी पुढाकार घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे .
या प्रसंगी प्रतिष्ठा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रजनी सावकारे, माजी नगरसेविका शैलेजा नारखेडे , कविता कोठारी, अनिता आंबेकर, माजी नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, पिंटू ठाकूर , भाजपाचे अध्यक्ष किरण कोलते, शिवसेना शिंदे गटाचे दीपक धांडे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी सुमारे ३७५ लाभार्थ्यांना गृहउपयोगी भांडी संच (३० वस्तूंचा सेट) वाटप करण्यात आले .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास शेलोडे , निलेश सोनवणे, अनिल मंदवाडे , प्रतीक आंबेकर, गजू भारंबे, हेमंत खंबायत, भूषण सोनवणे आदींसह अष्टविनायक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी गृहोपयोगी भांडी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता .
सामान्य व गरीब परिवारातील महिलांना हा भांडी सेट मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्याने महिलांनी आभार मानले . पावसाचे थेंब सुरू असुनही कार्यक्रमात उत्साह कायम होता .
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील कल्याणकारी योजनांपैकी एक असून, गरजू बांधकाम कामगारांना थेट मदतीचा हात देणारी ठरत आहे.