Wednesday, August 26, 2026
Homeजळगावचारचाकीच्या धडकेने माकड ठार . तरुणांसह किन्नरांनी केले अंत्यसंस्कार

चारचाकीच्या धडकेने माकड ठार . तरुणांसह किन्नरांनी केले अंत्यसंस्कार

चारचाकीच्या धडकेने माकड ठार . तरुणांसह किन्नरांनी केले अंत्यसंस्कार

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              फूलगाव ते जाडगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर एका चारचाकीस्वाराने माकडाला जोरदार धडक दिली त्यात माकडाच्या चेहऱ्याला जबर मार लागून ते जागीच गतप्राण झाले . हि घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली आहे .
या विषयी महामार्गावरून जाणाऱ्या एका व्यक्तिने वरणगाव येथिल सर्पमित्र ‘ व प्राणी मित्र विजय संजय सोनार यांना भ्रमणध्वनिवरून माहिती कळविली होती .
सदरची मंडळी त्वरीत घटनास्थळी गेले त्यावेळी गाडी चालक पळून गेला होता व माकड रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडले होते . त्यावेळी महामार्गावरील कर्मचारी भूषण कुंभार नशिराबाद , जयेश कोळी ,शुभम लोहारिया, योगेश शिरसाट यांचे मदतीने महा

 

लक्ष्मीनगरमधे घरी घेऊन गेले तेथे भुसावळमधील किन्नर अश्विनी ,राखी ‘रूपाली ‘ यांनी भूतदया दाखवून माकडाची अंघोळ वगैरे घालून त्याला नविन भगवी वस्त्रे चढविली व पूजाविधी करून त्याचेवर महालक्ष्मी नगरमधील मंदीराच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करून दफनविधी करण्यात आला .
वाहनधारकांनी वाहने चालवतांना समोर आजुबाजुला पाहून वाहने चालवावी फक्त माणसांकडेच लक्ष्य न देता मुक्या वन्य प्राणी जीवांकडे सुद्धा लक्ष्य द्यावे असा सुर यावेळी उमटला होता .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या