भुसावळ येथील बस स्थानकात अज्ञात इसमाचा मृत्यू
भुसावळ प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज
भुसावळ येथील बस स्थानकात आठ जून रोजी 35 वर्षीय अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
वय अंदाजे 30 ते 35 वर्ष, शरीराने बारीक, बांधा – बारीक, उंची 160 से.मी, रंग सावळा, डोक्यावर काळे केस व दाढी वाढलेली, अंगात शर्ट घातलेला नाही, ग्रे रंगाची जिन्स पँन्ट, अश्या वर्णनाचा अज्ञात इसम हा ८ जुन रोजी दुपारी तीन वाजेचे पुर्वी भुसावळ शहरातील बस स्टॅन्ड मधील कॅन्टीनच्या बाजुला सार्व जागी पुरुष पडलेला होता. तो काहीही एक हालचाल करीत नसल्याने त्यास लोकांनी तात्काळ अँम्बुल्सने ट्रामा केअर सेंटर, भुसावळ येथे दाखल केले होते .
कर्तव्यावर असणारे डॉक्टरांनी त्यास तपासुन मृत घोषीत केले आहे.
या प्रकरणी कैलाश शिंदे रा चोरवड धंदा रिक्षा चालक यांनी फिर्यादीवरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अ.मृनं. 27/2025 बी.एन.एस.एस 194 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
तरी सदर अनोळखी मयत पुरुषा बाबतीत कोणाला माहीत असल्यास त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन किंवा पोहे कॉ गणेश प्रल्हाद चौधरी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .