Sunday, June 15, 2025
Homeगुन्हाभुसावळ येथे सेवानिवृत्त नागरिकाच्या घरात चोरी; ५८ हजारांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ येथे सेवानिवृत्त नागरिकाच्या घरात चोरी; ५८ हजारांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ येथे सेवानिवृत्त नागरिकाच्या घरात चोरी; ५८ हजारांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ प्रतिनिधी. खानदेश लाईव्ह न्युज
शहरातील खडका रोडवरील रामदास वाडीत वास्तव्यास असलेल्या एका सेवानिवृत्त नागरिकाच्या घरात घरमालक बाहेर गावी गेल्याने अज्ञात चोरट्यांनी डाव साधुन चोरी केली आहे .
या चोरीत सोन्याचे दागिने, घरगुती उपकरणे व रोख रक्कम असा एकूण अंदाजे ५८,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

राजाराम बळीराम राणे (वय ७९), हे पत्नी रजनी राणे यांच्यासह खडका रोडवरील फिरदोस चिकन सेंटर मागे राहतात. काही दिवसांपूर्वी पत्नीच्या डोळ्याच्या ऑपरेशननिमित्त दोघेही नाशिक येथे मुलाकडे गेले होते.
दरम्यान, ७ जून रोजी शेजारी प्रवीण ब-हाटे यांनी फोन करून घरातून पाणी वाहत असल्याची माहिती दिली. त्यामुळे ८ जून रोजी सायंकाळी राणे भुसावळला परतले.

घर उघडून पाहिले असता पाण्याची मोटर, कुलर, A.C कंप्रेसर, तसेच कपाटातील सोने-चांदीचे दागिने आणि ३,००० रुपयांची रोख रक्कम आढळून आली नाही. तपासणीत आढळले की घराच्या मागील खिडकीची आसारी वाकवून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता.

चोरीस गेलेल्या मुद्देमालात डायकिन A.C कंप्रेसर
,अरिहंत कुलर ,टेक्समो पाण्याची मोटर ,तांब्याची भांडी ,सोन्याच्या दोन अंगठ्या ,सोन्याचे लॉकेट ,कानातील साखळी ,दोन कर्णफुले ,रोख रक्कम तीन हजार रुपये असा एकूण ५८ हजार पाचशे रुपये मालाचा सामावेश आहे .
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय नेरकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा लवकरात लवकर तपास लावावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या