Wednesday, June 18, 2025
Homeजळगावप्रेरणादायी - अनिष्ठ चालीरीतीला फाटा देत स्वतःच्या मुलाचा साखरपुड्यात विवाह

प्रेरणादायी – अनिष्ठ चालीरीतीला फाटा देत स्वतःच्या मुलाचा साखरपुड्यात विवाह

प्रेरणादायी – अनिष्ठ चालीरीतीला फाटा देत स्वतःच्या मुलाचा साखरपुड्यात विवाह

माजी प्रभारी नगराध्यक्ष कलिमखान मन्यारच्या कुटुंबाने
समाजासमोर ठेवला आदर्श

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
अनिष्ठ चालीरीतीला फाटा देऊन इस्लाम धर्मातील प्रेषित पैगंबर मोहंमद सल्लला वालैव सल्लम यांच्या शिकवणीला अनुसरून साध्या पध्दतीने आदर्श विवाह लावून देण्याचा एक प्रेरणादायी पायंडा म्हणून फैजपूर चे माजी प्रभारी नगराध्यक्ष कलिमखान मन्यारच्या कुटुंबाने स्वतःच्या मुलाचा साखरपुड्यात आदर्श विवाह पार पडल्याने मुस्लिम समाजात प्रेरणा देणारे ठरत आहे.शिवाय समाजासमोर आदर्श ठरत आहे.
अनिष्ठ चालीरीतीनां फाटा देऊन कमी वेळेत व कमी खर्चात लग्न कार्य पार पाडावे व या माध्यमातून समाज परिवर्तन व समाज विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जवळपास सर्वच समाजांमध्ये सामूहिक विवाहांचे आयोजन केले जातात.सध्याच्या धकाधकीच्या व महागाईच्या काळात कमी वेळेत व कमी खर्चात लग्न कार्य पार पडणेही काळाची गरज आहे.म्हणून इस्लाम धर्मातील प्रेषित पैगंबर मोहंमद सल्ललावालैवसल्लम यांच्या शिकवणीला अनुसरून इस्लाम धर्मात निकाह सोपं आहे प्रेषित पैगंबर मोहंमद सं यांची सुन्नत आहे.आणि सर्वात कमी खर्चात होणारा निकाह(विवाह)सर्वोत्कृष्ट आहे.प्रेषित पैगंबर मोहंमद यांच्या साडेचौदाशे वर्षांपूर्वीच्या शिकवणीला अनुसरून आदर्श विवाह पार पाडण्याचा प्रेरणादायी कार्य
फैजपूर माजी प्रभारी नगराध्यक्ष कलिमखान हैदर खान मन्यारच्या कुटुंबाने समाजासमोर ठेवला आदर्श रविवारी माजी प्रभारी नगराध्यक्ष कलिमखान मन्यार यांचे चिरंजीव दानिश खान यांचा निंभोरा ता.रावेर येथील शेख करीम मण्यार यांची नात व इस्माईल शेख मण्यार यांची कन्या रुकसार बी यांचा रविवारी साखरपुड्याचा कार्यक्रम होता.वर वधू पक्षांनी साखरपुड्यातच विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने एकत्रित विचारला मान्यता मिळाल्यावर चिरंजीव दानिश खान व कन्या रुकसार बी यांचा साखरपुड्यातच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.पद प्रतिष्ठा मोठ्या जल्लोषात मुलाचे विवाह करण्याची क्षमता असतांना देखील समाजकारण व राकारण करतांना आपल्या कडून आदर्शवत पायंडा ठेवला जावा व समाजात प्रेरणादायी ठरले पाहिजे अशा दूरदृष्टीने कलिमखान मन्यार यांनी साखरपुड्यातच विवाह आटोपल्याने साध्या पध्दतीने पार पडलेल्या आदर्श विवाह
चे सर्वत्र कौतूक होत आहे.शिवाय मुस्लिम समाजात प्रेरणा देणारे ठरत आहे.दरम्यान या आदर्श विवाह प्रसंगी माजी आमदार शिरिष चौधरी,युवा नेते धनंजय चौधरी,प्रल्हाद बोनडे,डिगंबर चौधरी,असगर सैय्यद,माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान,माजी नगरसेवक महेबूब पिंजारी,सावद्याचे माजी नगरसेवक फिरोज पठाण,राजीव बोरसे,फैजपूर चे काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज,सैय्यद कौसर अली, शेख इरफान शेख इकबाल,जलील शेख,शेख महेमुद शेख हसन (रावेर),शेख इरफान(चिनावल),सईदखान रशीदखान,शेख शाकिर,वाय डी पाटील,विवेक बोनडे,दिनेश पाटील व गावातील नागरिक मान्यवर यांनी वर वधू यांना शुभेच्छा दिल्या.उपस्थितांचे आभार हाजी शेख करीम मण्यार यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या