Monday, June 23, 2025
Homeजळगावआमदार जावळे यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला भेट / "गिफ्ट" म्हणून काँग्रेस जबाबदार...

आमदार जावळे यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला भेट / “गिफ्ट” म्हणून काँग्रेस जबाबदार पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

आमदार जावळे यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला भेट / “गिफ्ट” म्हणून काँग्रेस जबाबदार पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

पक्षाचे ध्येय उद्दिष्ट गेले खड्ड्यात.

यावल दि.१७   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               रावेर विधानसभेचे लोकप्रिय तरुण तडफदार आमदार अमोलदादा जावळे यांचा वाढदिवस उद्या बुधवार दि. १८ जून २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा होणार असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी आमदार जावळे यांना भेट / गिफ्ट म्हणून आपल्या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन मुंबई येथील एका भरगच्च कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघ पसरल्याने आता राजकीय पक्षांमध्ये आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आणि राजकारणाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाची ध्येय धोरणे उद्दिष्ट खड्ड्यात घातले जात असल्याची राजकारणात, समाजात चर्चा आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की रावेर विधानसभा मतदारसंघात तथा यावल तालुक्यात ज्यांनी आतापर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रभावाखाली आपले राजकारण,समाजकारण करून वैयक्तिक राजकीय, सामाजिक विकास साध्य केला त्यांनी आता आपल्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी गटात म्हणजे भाजपात आमदार जावळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य,व त्यांचे समर्थकांनी प्रवेश केल्याने संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात राजकारणाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.यामुळे काँग्रेसच्या कट्टर समर्थक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भाजपामधील काही ठराविक पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा भंग होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने ठराविक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या