Saturday, June 21, 2025
Homeगुन्हाभुसावळमध्ये भरधाव दुचाकीची धडक – तरुण गंभीर जखमी, मित्र किरकोळ जखमी; अपघातानंतर...

भुसावळमध्ये भरधाव दुचाकीची धडक – तरुण गंभीर जखमी, मित्र किरकोळ जखमी; अपघातानंतर आरोपी पसार

भुसावळमध्ये भरधाव दुचाकीची धडक – तरुण गंभीर जखमी, मित्र किरकोळ जखमी; अपघातानंतर आरोपी पसार

भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

गॅलेक्सी मेडिकलवरून औषधे घेऊन परत येणाऱ्या दोन तरुणांना भरधाव दुचाकीने जोरात धडक दिल्याने एका तरुणाचा पाय गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. ही घटना १९ जून २०२५ रोजी रात्री ९.२० च्या सुमारास सुभाष मोरे यांच्या पानटपरीसमोर, एम.जे . पार्किंगजवळ घडली.

विकास दशरथ विरघट (वय २७, रा. पंचशील नगर, भुसावळ) आणि त्याचा मित्र दिगंबर अशोक सरोदे हे गॅलेक्सी मेडिकलवरून औषध घेऊन एम एच १९ इ जे ७६६२ या दुचाकीवरून महेश नगरहून अष्टभुजा मंदिराकडे जात होते. यावेळी सूरज घनश्याम तायडे (रा. भुसावळ) हा एम एच १९ इ इ ८२२० या मोटरसायकलवरून भरधाव वेगात, अविचाराने वाहन चालवत समोरून आला आणि त्याने विरघट यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

या अपघातात विकास विरघट यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, दिगंबर सरोदे यांच्या पायाला किरकोळ मार लागला आहे. धडक दिल्यानंतर सूरज तायडे हा घटनास्थळी दुचाकी सोडून पळून गेला.

या प्रकरणी विकास विरघट यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी सुरज तायडेविरुद्ध अविचाराने व हयगयीने वाहन चालवून अपघात केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नाईक अर्चना अहिरे करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या