नवोदय परीक्षेत रोनित पाटीलचे यश
भुसावळ : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी साकेगाव येथील मूळ रहिवासी व भडगावस्थित डॉ. हेमंत व डॉ. प्रणिता पाटील यांचे चिरंजीव रोनित पाटील याने केंद्रीय विद्यालय अंतर्गत घेण्यात येणाऱ्या नवोदय परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.
पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता पहिली पासून शिक्षण घेत असलेल्या रोनित हेमंत पाटील याने इयत्ता पाचवीत असताना नवोदय ची परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये त्याने घवघवीत यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
वडील व आई डॉक्टर
रोनित हा लहानपणापासूनच हुशार आहे. त्याचे आई-वडील हेमंत पाटील व प्रणिता पाटील हे दोघं व्यवसायाने डॉक्टर असून ते ते भडगावला रुग्णसेवेत कार्यतत्पर आहेत. रोनित याच्या यशाने त्यांनी आपल्या मुलाचे कौतुक केले आहे. दरम्यान, रोनितला आई – वडीलांसह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.