Saturday, June 21, 2025
Homeगुन्हापिंप्राळा परिसरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल!

पिंप्राळा परिसरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल!

पिंप्राळा परिसरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी १८ जून रोजी दुपारी २ वाजता समोर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गुरूवारी १९ जून रोजी रात्री १० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील पिंप्राळा भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या कालावधीत पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी रामानंद नगर पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या