Monday, June 23, 2025
Homeजळगावलाकडांची अवैध वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त, वन विभागाची कारवाई

लाकडांची अवैध वाहतूक, ट्रकसह मुद्देमाल जप्त, वन विभागाची कारवाई

मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          विना पास जळावू लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असून याबाबत मुक्ताईनगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्य  गुप्त बातमीनुसार दि.२१ जून रोजी पहाटे 3.30 वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल रुईखेडा, वनरक्षक हरताळा व माळेगाव यांचेसह मौजे मलकापूर ते मुक्ताईनगर गस्त करीत असता बोदवड चौफुली जवळ टाटा कंपनीचा ट्रक क (एम.एच.२८ बी-७३२३) हा ट्रक तपासणी केली असता त्यात मिश्र प्रजातीचे जळाऊ लाकुड विनापास वाहतूक करीत असता चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले.
त्यात अंदाजे जळाऊ लाकडाचा माल हा 14.00 घ.मी. त्यातील मालाची किंमत ही अंदाजे 9 ते 10 हजार एवढी आहे.

 


वाहनाची बाजारभाव रक्कम अंदाजे 10 ते 11 लाख असुन सदर गुन्हयाबाबत प्र. रि. क्र 05/2025 जारी केला.
ही कार्यवाही उपवनसंरक्षक प्रविण ए., सहा. वनसंरक्षक यू. एम. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर. शिंदे तसेच वनपाल रुईखेडा डी.ए. जाधव, वनरक्षक हरताळा, डी.ए. बेलदार, वनरक्षक माळेगाव. आर.जी
शिर्के, वाहन चालक सुरेश महाले व वनमजूर मुक्ताईनगर यांनी केली आहे .
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे यांनी सांगितले की, वरील कार्यवाहीनुसार वनविभाग समस्त नागरिकांना आवाहन करीत आहे की अवैध वाहतुक व अवैध वृक्षतोड करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
त्याकरीता असे काही आढळून आल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या