Monday, June 23, 2025
Homeजळगावभटकन’ कादंबरीचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून तोंडभरून कौतुक

भटकन’ कादंबरीचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून तोंडभरून कौतुक

भटकन’ कादंबरीचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून तोंडभरून कौतुक

मुक्ताईनगर. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

धानोरा (ता. यावल) येथील रहिवासी आणि नेहरू विद्यालय, किनगाव (ता. यावल) येथील मुख्याध्यापक श्री. रविंद्र भास्कर सोनवणे लिखित ‘भटकन’ या प्रेरणादायी कादंबरीचे मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार मा. चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच तोंडभरून कौतुक केले.

‘भटकन’ कादंबरीची प्रत कैलास सूर्यवंशी यांनी आमदार पाटील यांना सस्नेह भेट दिली. या प्रसंगी विनोदजी तराळ (प्रगतशील शेतकरी), छोटूभाऊ भोई (शिवसेना उपजिल्हा प्रमुख), प्रमोद धामोडे (शिवसेना तालुकाप्रमुख), तसेच प्रफुल्ल पाटील (शिवसेना उपतालुकाप्रमुख) यांची उपस्थिती होती.

 

कादंबरीचे मुखपृष्ठ व पुस्तकाचे परीक्षण करताना आमदार पाटील यांनी लेखकाच्या लेखनशैलीचे व साहित्यातील योगदानाचे भरभरून कौतुक केले. “शाळेचे मुख्याध्यापकच लेखक असतील, तर विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या प्रगतीला नक्कीच चालना मिळते. ‘भटकन’ ही कादंबरी विद्यार्थ्यांसह प्रत्येक वाचकासाठी प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत त्यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी त्यांनी लेखक श्री. रविंद्र सोनवणे यांना पुढील साहित्यप्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आणि कादंबरीसाठी उत्तम यश लाभो, अशा सदिच्छाही व्यक्त केल्या

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या