Sunday, July 20, 2025
Homeजळगावयावल गटविकास अधिकारी लोकहिताची,विकासाची कामे प्रसिद्धी माध्यमांपासून दूर ठेवून शासनाची,वरिष्ठ अधिकाऱ्यांची, जनतेची...

यावल गटविकास अधिकारी लोकहिताची,विकासाची कामे प्रसिद्धी माध्यमांपासून दूर ठेवून शासनाची,वरिष्ठ अधिकाऱ्यांची, जनतेची दिशाभूल करीत आहे.

यावल गटविकास अधिकारी लोकहिताची,विकासाची कामे प्रसिद्धी माध्यमांपासून दूर ठेवून शासनाची,वरिष्ठ अधिकाऱ्यांची,
जनतेची दिशाभूल करीत आहे.

आमदारांसह प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींनी व्यक्त केली तीव्र नाराजी.

यावल दि.२३  खानदेश लावी न्यूज प्रतिनिधी
आज सोमवार दि.२३ रोजी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे,रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांच्या व जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रार निवारण सभा घेण्यात आली.परंतु तक्रार निवारण सभेचे नियोजन आणि सभेपासून प्रसिद्धी माध्यमांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याने आमदार महोदय यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आमदार व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.मंजुश्री गायकवाड यांना चांगले खडे बोल सुनावले.
याआधी सुद्धा गटविकास अधिकारी यांनी आढावा बैठकीचे नियोजन व्यवस्थित न करता आपल्या कर्तव्यात कसूर केली होती,सतत पंचायत समितीच्या कारभाराबाबत दर सभेत नाराजी व्यक्त केली जाते.
जिल्हा परिषद आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रावेर आमदार अमोल जावळे व चोपडा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण सभा घेण्यात आली.परंतु या सभेचे चुकीच्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे सगळेच चांगलाच गोंधळ झाला,या चुकीच्या, बेशिस्त कर्तव्यात कसूर करणाऱ्या नियोजनामुळे जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल सह दोन्ही आमदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.तक्रारदारांना आपली तक्रार देखील सभेत व्यवस्थित मांडता आली नाही व गटविकास अधिकारी यांच्या अनेक तक्रारीमुळे लोकप्रतिनिधी,अधिकारी यांनी सभेतच त्यांना खडे बोल सुनावले, शेतकऱ्यांचे गोठे आणि घरकुल धारकांचे रखडलेले अनुदान तसेच गटविकास अधिकारी नागरिकांना भेटत नसल्याच्या तक्रारींनी आणि इतर काही कारणांनी सभा चांगलीच गाजली
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली होती.या सेवेकरीता तालुक्याभरातून मोठ्या संख्येत नागरिक आपल्या तक्रारी घेऊन या आयोजित सभेत आले होते.मात्र, पंचायत समितीच्या छोट्याशा सभागृहातच हा कार्यक्रम गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी आयोजित केल्यामुळे त्याचा पुरता बोजवारा उडाला.अधिकाऱ्यांनीचं सभागृह हाउसफुल झाल्याने तक्रारदार थांबणार कुठे अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आल्या आल्या आमदार अमोल जावळे व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे सह जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे नागरिकांनी घरकुल रंगाळलेल्या अनुदान आणी गोठ्यांच्या प्रकरणातील अनेक तक्रारी केल्या तसेच गटविकास अधिकारी या कार्यालयात भेटत नाही अशा तक्रारी मांडल्या. प्रचंड गोंधळात ही सभा सुरू झाली आणि तक्रार दाराच्या प्रचंड तक्रारी या ठिकाणी येत होत्या.या दरम्यानच उडालेल्या गोंधळात चोपडा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी नागरिकांना विनंती करून त्यांच्या तक्रारी संदर्भात प्रशासनाचा आम्हीच आढावा घेतो असे सांगितल्यानंतर सभागृहात फक्त जिल्हा परिषद,पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी हेच थांबले त्यानंतर घरकुलच्या रेंगाळलेल्या अनुदान संदर्भात आढावा घेतला असता तब्बल ३ हजार घरकुल लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता त्यांच्या खात्यात गेला नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रलंबित अनुदान का राहिले याबाबत अधिकारी व आमदार यांनी गटविकास अधिकारी यांना खडे बोल सुनावले.या सभेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी,संचालक सूर्यभान पाटील,हर्षल पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष सागर कोळी,अनिल पाटील,विलास चौधरी,उजैनसिंग राजपूत,भरत चौधरी सर,मुन्ना पाटील,तालुक्यातील सरपंच, उपसरपंच,सदस्य,पदाधिकारी कार्यकर्ते,ग्रामस्थ यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी,पंचायत समितीचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सहायक गट विकास अधिकारी यांनी केले.
यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.मंजुश्री गायकवाड यांनी आज पर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील विकास कामांची योजनांची माहिती
माहितीसाठी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविली नाही प्रसिद्धी माध्यमांना कधीही एकाच वेळेला माहिती न दिल्याने प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी मध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
——————————————–

सहाय्यक गटविकास अधिकारी सपकाळे एकाच ठिकाणी ठाण मांडून –
यावल पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे हे यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात एकाच ठिकाणी ७ वर्षापासून ठाण मांडून असल्याने त्यांचे गटविकास अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत संबंधित सर्व अधिकारी,कर्मचारी,कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी सलोख्याचे हितसंबंध निर्माण झाले असल्याने तसेच काही महत्त्वाची माहिती नागरिकांना न देण्याची महत्त्वाची जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडून समन्वय साधून घेत असल्याने अधिकाऱ्यांच्या विश्वासातील ते एक खास विश्वासू कार्यालयीन लाभदायक कर्मचारी असल्याचे यावल तालुक्यात बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या