Tuesday, June 24, 2025
Homeजळगावजुना पेव असल्याने अवैध वाळू वाहतूक डंपरने पडलेला खड्डा ग्रामपंचायतने मातीचा भराव...

जुना पेव असल्याने अवैध वाळू वाहतूक डंपरने पडलेला खड्डा ग्रामपंचायतने मातीचा भराव टाकून बुजला.

जुना पेव असल्याने अवैध वाळू वाहतूक डंपरने पडलेला खड्डा ग्रामपंचायतने मातीचा भराव टाकून बुजला.

सातोद ग्रामपंचायत पराभूत सदस्याच्या घरासमोरील घटना.

यावल दि.२४. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुक्यातील सातोद गावात लोकेश सुरेश तळेले यांचे मालकीच्या जागेवर बांधकाम सुरू असल्याने बांधकामाच्या ठिकाणी “सरकार” अवैध वाळू वाहतूक दाराचे डंपर आले असता सातोद ग्रामपंचायत निवडणूकीत पराभूत पीझालेल्या सदस्याच्या घराबाहेर रस्त्याच्या खाली जुना पेव असल्याने वाळू डंपरच्या वजनाने भला मोठा

 

खड्डा पडला होता त्या ठिकाणी ग्रामपंचायतने मातीचा भराव टाकून तो पेव / खड्डा बुजून वाहतूक सुरळीत केली असल्याची माहिती सातोद ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत पाटील यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की
सातोद गावात खुशाल दिगंबर पाटील यांच्या घरासमोर रस्त्याखाली एक जुना पेव असल्याने त्या ठिकाणी वाळूचे वजनदार डंपरमुळे मोठा खड्डा पडला यात ग्रामपंचायतीचा कोणताही हलगर्जीपणा किंवा दुर्लक्षपणा झालेला नाही,अवैध वाळू वाहतुकीचे वजनदार डंपर मुळे पेवाच्या ठिकाणी खड्डा पडला होता तो सातोद ग्रामपंचायतीने मातीचा भराव टाकून बुजून टाकला परंतु सातोद ग्रामपंचायत मध्ये पराभूत झालेल्या एका उमेदवाराच्या घरासमोर खड्डा पडला ही घटना एक नैसर्गिक आहे यात ग्रामपंचायतने दुर्लक्ष केल्याचा प्रश्न उद्भवत नाही अशी माहिती सातोद ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या