भुसावळात महिलेला मारहाण करीत केला विनयभंग ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील एका परिसरात राहणाऱ्या एका ४१ वर्षीय महिलेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर तिच्या मुलांना देखील जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहितेला ननंद, नंदोई भाऊ आणि ननंदचा मुलगा यांनी एकत्र येऊन तिच्या चार मुलांना जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर घरात घुसून सार्वजनिक ठिकाणी, गल्लीतील लोकांसमोर महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच विवाहितेचा विनयभंग करत तिला घरातून हाकलून दिले आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या संतापजनक घटनेनंतर पीडित महिला थेट भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोहेकॉ दीपक पाटील हे करीत आहे.

