बाल संस्कार विद्या मंदिरात ५०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली.

यावल दि.२५ खानदेश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी
यावल येथील बाल संस्कार विद्यामंदिर शाळेत इ.१ली ते इ. ७ वी वर्गातील एकूण ५०० विद्यार्थ्याची शासकीय ग्रामीण रुग्णालयातील डॉ.आमीन तडवी (MO), डॉ.परवीन तडवी (MO), विनोद बोदडे (Phr), श्रीमती. रुपाली बाविस्कर (Sister) यांचकडूनआरोग्य तपासणी दि. २० जून ते दि.२४ जून २०२५ या कालावधीत करण्यात आली. विद्यार्थी,पालक व शिक्षकांना किरकोळ आजार,प्राथमिक औषध उपचार,आरोग्य विषयक सवयी, पौष्टिक आहार,वैयक्तिक स्वछता इ. विषयी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील २७ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आणि ९४ विद्यार्थ्यांना औषधी देण्यात आली.
सदर प्रसंगी संस्था अध्यक्ष महेश वाणी व मुख्याध्यापक सुनील माळी सर यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी बाबत सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

