मनसेच्या पावरमुळे स्मशान भूमीत प्रकाश पडला.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथील श्री महर्षी व्यास मंदिराजवळील स्मशानभूमीत अंधार आणि घाणीचे साम्राज्य राहात असल्याबाबत मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे मागील आठवड्यात लेखी स्वरूपात केली होती मनसेची आक्रमक तथा पावरफुल भूमिका लक्षात घेता यावल नगरपरिषदेने तात्काळ दाखल घेऊन यावल स्मशानभूमीची साफसफाई करून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोलवर दिवाबत्तीची व्यवस्था केली यामुळे स्मशानभूमीत रात्रीच्या वेळेस लख्ख असा प्रकाश पडला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जनहित विधी विभाग चेतन आढळकर त्यांच्या सहकारी यांनी नगरपालिकेकडे मागणी केली होती त्या अनुषंगाने स्मशानभूमीची स्वच्छता व स्ट्रीट लाईट लावणे या संदर्भात निवेदन दिले होते तरी स्वतः त्यांनी स्मशानभूमीत थांबून नगरपालिकेकडून तिथे सर्व प्रकाश निर्माण होईल अशा पद्धतीने लाईट लावून घेतले व रात्रीच्या वेळेस अंत्यविधीसाठी प्रकाशमय स्मशानभूमी करण्यात आली.या जनहिताच्या स्तुत्य मागणीला मनसे पदाधिकाऱ्यांना यश आले असून यावल शहरातून मनसे पदाधिकारी चेतन अढळकर,किशोर नन्नवरे, गौरव कोळी,शाम पवार व त्यांच्या सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्तरातून कौतुक केले जात आहे.