Friday, May 1, 2026
Homeजळगावयावल येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रम संपन्न.

यावल येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रम संपन्न.

यावल येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रम संपन्न.

शुद्ध जीवनाकडे एक पाऊल.

यावल दि. २६   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     यावल येथील सरस्वती कनिष्ठ व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिन ( २६ जून ) साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी व त्यांचे आयुष्य व्यसनमुक्त व्हावे,या उद्देशाने एक प्रभावी व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती देखील साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रा.श्रीकांत जोशी सर होते.कार्यक्रमाला बी.सी. ठाकूर,एन.डी.भारुडे आणि तसेच विज्ञान शिक्षक तथा यावल तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष डॉ.नरेंद्र महाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.प्राचार्य श्रीकांत जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.महाले सरांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ दिली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती विषयक पुढील घोषवाक्ये घोषणांच्या स्वरूपात सादर केली.
१) नको रे व्यसन, हवे आयुष्य सुंदर! (२) शपथेवर ठाम राहू, व्यसनांना दूर ठेवू!”
डॉ.नरेंद्र महाले सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे भावनिक आणि वैज्ञानिक महत्त्व समजावून सांगितले.त्यांनी सांगितले की, “अमली पदार्थ एकदा सेवन केले की त्यातून सुटका करणे फार कठीण होते. म्हणून सुरुवातच होऊ देऊ नका.”
प्राचार्य प्रा.श्रीकांत जोशी यांनी आपल्या भाषणात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी जीवनकार्याचे महत्त्व पटवून दिले व,”विद्यार्थ्यांची सर्वांगिण प्रगती व्यसनमुक्त जीवनावर अवलंबून आहे.आपण एकदा शपथ घेतली की ती आयुष्यभर आठवणीत राहावी अशी असावी.”अशी माहिती दिली.
कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हात वर करून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या शपथचे वाचन केले.उपस्थित सर्वांनी ही खालील शपथ ग्रहण केली.
‘ आम्हाला जाणीव आहे की आपल्या देशात,विशेषतः लहान मुले आणि तरुणांमध्ये अमली पदार्थांचे सेवन वाढत आहे.आम्ही वचन देतो की आम्ही अमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी सहकार्य करू.आम्ही वचन देतो की आम्ही कोणत्याही हेतूसाठी कोणत्याही प्रकारे हानिकारक किंवा बेकायदेशीर पदार्थांचे सेवन करणार नाही
आम्ही प्रत्येक व्यक्तीला,विशेषतः मुलांना आणि तरुणांना प्रोत्साहन देऊन अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करू.जेणेकरून भारतातील तरुणांना अमली पदार्थमुक्त जीवन जगता येईल.आणि ते समाजाचे रचनात्मक आणि महत्त्वपूर्ण सदस्य बनू शकतील.
अमली पदार्थांपासून दूर राहू आणि निरोगी जीवन जगण्याची आज आम्ही प्रतिज्ञा करतो.’
या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त व मनापासून होता.विविध फलकांद्वारे विद्यार्थ्यांनी व्यसनाचे दुष्परिणाम दाखवले होते.वातावरण शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि सकारात्मक होते. कार्यक्रमानंतर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी तयार केलेल्या अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाच्या पोस्टर्सचे अवलोकन केले.त्या प्रसंगी डॉ. नरेंद्र महाले यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.पी. वैद्य सर यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.बी.चंदनकार सर यांनी केले.हा शपथविधी कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात दीर्घकाळ टिकणारे सामाजिक भान निर्माण करणारा ठरला.कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या