आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी यावल आगारातर्फे एसटीची खास सेवा.
यावल दि.२६ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी यावल आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी भाविक भक्तांसाठी एसटी बसेसची खास सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती मिळाली.
यावल आगारातून पंढरपूर यात्रेसाठी जादा बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
यावल व परिसरातील भाविक भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे विठुरायाच्या दर्शनासाठी यावल आगारातून दररोज सकाळी ७ वाजता यावल पंढरपूर बस सुरू करण्यात आली असून ज्या गावातून ४५ भाविकांचा गट तयार असेल त्या गावातून थेट विठुरायाच्या दर्शनासाठी बस देण्यात येणार आहे,तरी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक यावल दिलीप महाजन यांनी केले आहे.