हिंदी सक्तीला यावल तालुक्यातून मनसेचा तीव्र विरोध.

यावल दि.२६ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये केंद्र शासनाने सक्तीची हिंदी लागू करण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली आहे.याबाबत त्यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना थेट पत्र पाठवून मातृभाषा आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.
या पत्रानुसार यावल तालुक्यातील मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अधिकृतरित्या पत्र देऊन तीव्र विरोध दर्शविला आहे.
या कार्यवाहीत मनसेच्या आदेशाची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांच्या मातृभाषेच्या हक्कासाठी ठाम उभं राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार,मनविसे यावल तालुका उपाध्यक्ष उदय पाटील,भरत कोळी,कलिंदर तडवी, योगेश कोळी,प्रतीक पाटील व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेचा स्पष्ट विश्वास आहे की, राज्यात मराठी भाषेचा अवमान होऊ दिला जाणार नाही. शाळांमध्ये सक्तीची हिंदी लादण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही.विद्यार्थ्यांचे शिक्षण स्थानिक भाषेतच सुलभ आणि प्रभावी होते,हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.त्यामुळे अशा जबरदस्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मैदानात उतरली आहे. त्यानुसार यावल तालुक्यातून सुद्धा मनसे कडून तीव्र विरोध होत आहे.

