शेतकऱ्यांना सतत “बुरे ” आर्थिक हानिकारक दिन.

एकाच रात्री दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या स्टार्टर पेट्या फोडल्या.
यावल दि.२७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शेतकऱ्यांना नेहमी निसर्ग,शासन, कृषी विभाग,रसायनिक खते,बी बियाणे,व्यापारी,वीज वितरण कंपनी,महसूल व इतर संबंधित अधिकारी यांच्यासह मजूर, मध्यस्थी,सामाजिक इत्यादी क्षेत्रात तीव्र असा संघर्ष करावा लागत असताना शेती शिवारात सुद्धा अज्ञात चोरटे शेतकऱ्यांचा शेतीमाल,साहित्य तोडफोड करून चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांना सतत “बुरे” आर्थिक हानिकारक दिन असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास दिनांक २५ व २६ जून २०२५ चे रात्री यावल ते जुने कोरपावली रस्त्यावरील एक नव्हे एकूण १० ते १५ शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवरील ट्यूबवेलच्या ठिकाणचे इलेक्ट्रिक स्टार्टरच्या पेट्यांची तोडफोड करून फेज काढून तांब्याच्या तार,प्लेट,ट्यूबवेलची केबल चोरून नेल्या.अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या शेतातील केळीचे घड व इतर पिक, पीव्हीसी पाईप आणि काही मौल्यवान वस्तू, शेती उत्पादित वस्तू अज्ञात चोरटे रात्री बे रात्री व दिवसा सर्रासपणे चोरून नेत असल्याच्या घटना घडत आहेत याबाबत काही बोटावर मोजण्या इतके शेतकरी पोलीस स्टेशनला तक्रारी देत असली तरी अज्ञात चोरट्यांवर परिणामकारक कारवाई होत नसल्याने शेतकरी चारी बाजूंनी वैतागले आहेत, देशाचे पंतप्रधान अच्छे दिन असल्याचे म्हणत असले तरी मात्र शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी “बुरे”आर्थिक हानिकारक दिन सुरू असल्याने याकडे राज्यात व केंद्रात असलेल्या सरकारने लक्ष केंद्रित करून शेतकरी हितासाठी पोलिसांमार्फत कडक कारवाई करावी अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
रात्रीच्या वेळेस पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात रिकामटेकडी जे फिरत असतात ते पोलिसांना दिसून येत नाही का..? रात्री दिवसा अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याने पोलीस आणि महसूल विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कशामुळे होत आहे याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

