यावल येथील आठवडे बाजार बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर भरतो.

जिल्हाधिकारी जळगाव,बांधकाम विभाग,आणि नगरपरिषदेचे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष.
महिलेच्या पायावरून वाहनाचे चाक गेल्याने जखमी.
यावल दि.२७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल येथील आठवडे बाजार शुक्रवारी यावल – चोपडा तथा बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राज्य मार्गावर भरत असल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते आज तालुक्यातील चुंचाळे येथील कस्तुराबाई चुडामन सावकारे या महिलेच्या पायावरून वाहनाचे चाक गेल्यामुळे ती महिला गंभीर जखमी झाली तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात औषध उपचार करून जळगाव रुग्णालयात हलवण्यात आल्याने यावलकरांमध्ये मोठी खळबळ उडाली,आठवडे बाजाराच्या जागेवरील आणि महामार्गाच्या आजूबाजूस झालेल्या अतिक्रमणांकडे जिल्हाधिकारी जळगाव,सार्वजनिक बांधकाम विभागासह यावल नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
यावल आठवडे बाजारातील अतिक्रमणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच २९ मे २०२५ रोजी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन अतिक्रमण काढणे संदर्भात मागणी केली होती आणि आहे तरीसुद्धा यावल नगरपालिकेतील कोणतीही कारवाई न केल्याने अतिक्रमण जैसे थे आहे.आठवडे बाजारात अतिक्रमण झाल्याने तसेच आठवडे बाजारातील जुने व्यापारी संकुलन जागा खाली न केल्यामुळे आठवडे बाजाराची जागा बाजारासाठी कमी पडत असल्याने पर्यायी भाजीपाला विक्रेते बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्याच्या साईट पट्ट्यांवर आपला बाजार मांडतात तसेच हात गाडीवर विविध वस्तू विक्रेते हे सुद्धा भर रस्त्यात आपल्या हात गाडी लोड गाडी लावत असल्यामुळे आणि पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत असल्याने शुक्रवारी बाजाराच्या दिवशी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. बाजाराची आणि वाहनांची प्रचंड वर्दळ असल्यामुळे बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांसह या रस्त्यावर चालणे अत्यंत मुश्किल अडचणीचे झाले आहे तरी याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष केंद्रित करून तसेच पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नगरपरिषद बांधकाम विभाग जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी अहवाल पाठवून यावल शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेकामी कार्यवाही करावी अन्यथा यावल शहरात एखाद्या वेळेस फार मोठी अप्रिय घटना घडणार असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की
बऱ्हाणपूर महामार्गावर आठवडे बाजार भरला जातो त्या ठिकाणी मोठे अवजड वाहन हे ये-जा करत असतात व त्यांना जाण्यासाठी खुप कसरत करावी लागते व महिला मोठया प्रमाणात बाजार करण्यासाठी येत असतात व भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आठवडे बाजार हा नेहमीप्रमाणे नगरपरिषदेच्या आतल्या जागेत भरत होता व आहे तरी आजुबाजूस मोठया प्रमाणात अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण काढल्यास आठवडे बाजारातील जागा मोकळी होऊन रोडवरील बाजार हा मूळ बाजाराच्या ठिकाणी बसेल अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषद विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून लेखी आदेश असताना यावल नगर परिषदेने गेल्या पाच ते सात वर्षात अतिक्रमण का काढले नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे,आठवडे बाजारात महिलां
साठी शौचालय व इतर सुविधा अस्तित्वात नाही तरी बाजारात येणाऱ्या महिलांसाठी व नागरिकांसाठी ही सुविधा आपण
नगर परिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात यावी तरी आम्ही या निवेदनाद्वारे आपणांस सुचित करीत आहोत या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विधि विभाग राज्य उपाध्यक्ष चेतन
अढळकर, त्यांचे सहकारी पदाधिकारी गौरव कोळी,किशोर नन्नवरे,श्याम पवार यांनी केली आहे आणि तात्काळ कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत नागरीक व महिलांना सोबत घेवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला होता तरी सुद्धा यावल नगर परिषदेने तात्काळ दखल न घेतल्यामुळे आज आठवडे बाजारात अपघाताची अप्रिय घटनेची सुरुवात झाली.यापुढे अप्रिय घटना घडू नये म्हणून यावल नगरपरिषदेने तात्काळ कारवाई करावी अन्यथा मनसे लवकरकच आंदोलन छेडणार असल्याची माहिती चेतन आढळकर यांच्यासह त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिली.

