Monday, June 30, 2025
Homeगुन्हागुरांची वाहतूक करणारे वाहनावर कारवाई ; गुन्हा दाखल!

गुरांची वाहतूक करणारे वाहनावर कारवाई ; गुन्हा दाखल!

गुरांची वाहतूक करणारे वाहनावर कारवाई ; गुन्हा दाखल!

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नेरी येथून फत्तेपूरकडे गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत वृत्त असे कि, नेरी येथे स्वयंम ईश्वर कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ रोजी दुपारी नेरी येथून फत्तेपूरला पिकअप वाहनात पाच बैलांची वाहतूक अवैध केली जात होती. कुमावत व त्याच्या मित्रांनी वाहनचालकाला बैल कोठे नेत असल्याचे विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांनी वाहन नेरी दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात आणले आहे.
पोलिसांनी राकेश रघुनाथ रागडे (रा. भराडी, ता. सिल्लोड) व सयद अरबाज सयद नूर (रा. कुरेशी मोहल्ला, फत्तेपूर, ता. जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार गणेश भावसार करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या